रिद्धपूरच्या पवित्र भूमीत नवमी उत्सवाचा उत्साह; पीडाहरण कार्यक्रम भक्तिभावात संपन्न | सक्षम न्यूज |

रिद्धपूरच्या पवित्र भूमीत नवमी उत्सवाचा उत्साह; पीडाहरण कार्यक्रम भक्तिभावात संपन्न | सक्षम न्यूज |

सक्षम महाराष्ट्र न्यूज
Open in Bideo App Install from Google Play

Opening Bideo App... Tap button above if not opened.

रिद्धपूरच्या पवित्र भूमीत नवमी उत्सवाचा उत्साह; पीडाहरण कार्यक्रम भक्तिभावात संपन्न | सक्षम न्यूज |

रिद्धपूर नवमी उत्सव 2026: श्री प्रभू बाबांच्या राजमठात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. महानुभाव पंथाच्या विविध मठांमध्ये धार्मिक कार्यक्रम; महंत कृष्णराज बाबा बिडकर यांच्या हस्ते पीडाहरण कार्यक्रम संपन्न. रिद्धपुरात नवमी उत्सवाला भक्तांचा महासागर! श्री प्रभू बाबांच्या राजमठात अलोट गर्दी रिद्धपूर, अमरावती : महानुभाव पंथाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या रिद्धपूर नगरीत नवमी उत्सवानिमित्त भक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. श्री प्रभू बाबांच्या राजमठात दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी झाली. विविध मठांमध्ये धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. नवमी उत्सवानिमित्त प्रभू बाबांचे दर्शन घेण्यासाठी विविध भागांतून भाविक रिद्धपूरमध्ये दाखल झाले. राजमठ परिसरात भाविकांची रीघ लागली होती. रिद्धपूर येथील श्री पाचराऊत महानुभाव, पैठणकर महानुभाव, दर्यापूरकर महानुभाव, गोपीराज महानुभाव, श्री यक्षदेव मठ आणि फुलारी मठ यांसह विविध धार्मिक स्थळांवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दर्शन, धार्मिक परंपरा आणि प्रसादवंदनामुळे रिद्धपूर नगरीत श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला

सक्षम महाराष्ट्र न्यूज