परभणी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा संप गेल्या १५ ते २० दिवसांपासून सुरू असून याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे, दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असताना विद्यार्थ्यांना आवश्यक दाखल्यांसाठी मनपाच्या फेऱ्या माराव्या लागत असून सर्व महत्त्वाची कामे ठप्प पडली आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सय्यद अकबर अली यांनी आज थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून कर्मचाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करून हा संप त्वरित मिटवावा अशी मागणी केली आहे, तसेच प्रशासनाने यावर तातडीने तोडगा न काढल्यास येणाऱ्या काळात नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशाराही सय्यद अकबर अली यांनी दिला आहे, आता प्रशासन यावर काय निर्णय घेते आणि परभणीकरांना दिलासा कधी मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Open in Bideo App Install from Google PlayOpening Bideo App... Tap button above if not opened.